विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र करण्यासाठी पोलीसांसह गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरले होते. नववर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रणासाठी त्यांनी गस्त घातली.Assam Chief Minister himself took to the streets to check for drunkenness in vehicles
मद्यपान करून वाहन चालवल्याने होणारे मृत्यू होऊ नयेत या मोहिमेचा एक भाग म्हणून वाहनांची तपासणी करताना मुख्यमंत्री वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांमुख्यमंत्री म्हणाले, रात्रभर गुवाहाटीच्या रस्त्यावर होतो. ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र बनवण्याच्या आमच्या आवाहनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आनंदित झालो.
गुवाहाटीच्या लोकांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल अभिनंदन. आपण २०२२ मधील प्रत्येक दिवस आणि रात्र अपघातमुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवूया.शर्मा यांनी शनिवारी सांगितले की २०२१च्या शेवटच्या दिवशी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियम लागू करण्यासाठी विशेष मोहिमेनंतर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात कोणताही रस्ता अपघात झाला नाही.
वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले.सरमा यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन वर्षाच्या पहिल्या पूर्वसंध्येपूर्वी दारू पिऊन गाडी चालवण्याविरोधात मोहीम उघडली होती.
दारू पिऊन वाहन चालवू नका, असे आवाहन त्यांनी केले होते. नवीन वर्ष जवळ येत असताना, सावधगिरीने वाहन चालवून अपघातमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन मी जनतेला करतो असे त्यांनी म्हटले होते.
Assam Chief Minister himself took to the streets to check for drunkenness in vehicles
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार नवे टॅब
- शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात, रावसाहेब दानवेंचा टोला
- गळ्यात उपरणे परशु हातात; ब्राह्मण मतांच्या अखिलेश प्रेमात!!
- मुंबई मालमत्ता कर माफी : निर्णय कोणाचा?, केव्हाचा??; तोंडाची वाफ केव्हाची?, कोणाची??