• Download App
    पुणे जिल्ह्यात शिवसेना- राष्ट्रवादी आमने-सामने, गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याकडून शिवसैनिकाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप|Shiv Sena-NCP clash in Pune district, allegation of threatening to kill Shiv Sainik by Home ministers close worker

    पुणे जिल्ह्यात शिवसेना- राष्ट्रवादी आमने-सामने, गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याकडून शिवसैनिकाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आमने-सामने आले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने एका शिवसैनिकाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे. तुमची आघाडी चालू ठेवा पण आम्हाला जगू द्या असेही त्यांनी म्हटले आहे.Shiv Sena-NCP clash in Pune district, allegation of threatening to kill Shiv Sainik by Home ministers close worker

    गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता शिवसैनिकाला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकण्याची धमकी देतो, असा आरोप आढळराव पाटलांनी केला. आमचे पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडी सरकार आहे, तर तुमचं चालू द्या, फक्त आम्हाला जिल्ह्यात जगू द्या.



    आढळराव पाटील म्हणाले, याच जिल्ह्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याने चार दिवसांपूर्वी माझ्या एका कार्यकत्यार्ला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवलं म्हणून धमकावलं. त्याला मारण्याची धमकी दिली. तुला गावात राहायचं का, तुला संपवून टाकू अशी धमकी गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता करतो आहे.

    आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडीचं सरकार आहे तर तुमचं चालू द्या, फक्त जिल्ह्यात आम्हाला जगू द्या, आम्हाला मारू नका. आघाडीने याबाबत मित्रपक्षांना सांगावं.आता आम्ही विकास करू द्या, निधी द्या या मागण्याही करायचं सोडून दिलं आहे. ही बैलगाडी शर्यत बंद करण्याचं कारण काहीच नव्हतं.

    फक्त शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव यांनी त्यांच्या गावात शर्यत भरवली हे त्यांच्या डोळ्यात खुपलं म्हणून त्यांनी स्थगिती दिली. कुणाच्या डोळ्यात खुपतं हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण जिल्हा आणि राज्याला हे माहिती आहे, असा आरोपही आढळराव-पाटील यांनी केला आहे.

    माझा शिवसेनेचा खेड तालुक्याचा पंचायत समिती सभापती ६ महिन्यांपासून तुरुंगात सडतो आहे. त्याच्यावर नाहक ३०७ चा गुन्हा दाखल केला. त्यावर डॉक्टरांचं प्रमाणपत्र देखील नाही. त्याला जामीन मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे आमदार आणि इतर नेते दबाव टाकत आहेत.

    ही गोष्ट वेळोवेळी नेत्यांच्या कानावर घातली. त्यांनीही पाहिजे तशी मदत केली. परंतु हे चित्र एका बाजूला आहे. शिवसेनेच्या माझ्या सभापतीने काय घोडं मारलं होतं. त्याच्यावर खोटा गुन्हा का दाखल केला. त्याचं संपूर्ण घर तुरुंगात टाकले.

    Shiv Sena-NCP clash in Pune district, allegation of threatening to kill Shiv Sainik by Home ministers close worker

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!