प्रतिनिधी
मुंबई : भारत जोडो यात्रेचा टीआरपी महाराष्ट्रात घसरल्यानंतर तो टीआरपी सावरण्यासाठी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र सोडले. मात्र, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला असून राहुल गांधींनी आत्तापर्यंत मागितलेल्या माफीनाम्यांची यादीच सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. As soon as Savarkar was called an apologetic, Rahul Gandhi’s list of apologies went viral on social media
सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे, या यात्रेच्या दरम्यान वाशिम मध्ये जाहीर सभेत आणि अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अवमान केला. त्यानंतर यांचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणी मनसेनेही राहुल गांधी यांच्यावर टीका केली, बुधवार, १७ नोव्हेंबर रोजी रणजित सावरकर यांनी तर राहुल गांधी यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता सोशल मीडियातही राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
राहुल गांधींचे माफीनामे
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात वीर सावरकर यांनी तुरुंगातून सुटका करवून घेण्यासाठी ब्रिटिशांकडे माफी मागितली होती, असे म्हटले होते. आता सोशल मीडियात राहुल गांधी यांनी कितीवेळा माफी मागितली होती, याचा तपशील दाखवला जात आहे. यामध्ये फेसबुकवरील नेहा जाधव यांची फेसबुक पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. यात नेहा जाधव म्हणतात : माफीवीर कोण है भाई??? सावरकरांनी माफी मागितली की नाही? का मागितली? हा आजच्या काळात महत्त्वाचा विषय नाहीच. त्याचा आता काही फायदा नाही. कारण सावरकर मूळातच हयातीत नाहीत. शिवाय ते काही पंतप्रधान पदासाठी भावी उमेदवारही नाहीत. उलट आजच्या काळातल्या राहुल गांधी या युवा नेत्याने किती किती वेळा माफी मागितली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण काहींच्या मते ते भावी पंतप्रधान आहेत. मग राहुल गांधीने किती वेळा माफी मागितली हे देखील पहा. भारत तोडो यात्रेच्या शुभेच्छा!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App