• Download App
    MLA Amit Satam जवळपास ५० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण; ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

    MLA Amit Satam : जवळपास ५० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण; ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

    MLA Amit Satam

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : MLA Amit Satam पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास ५० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत.MLA Amit Satam

    आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि गोरेगाव येथील नाला सफाई कामांची पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापालिकेचे सभागृह नेते गणेश खनकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी, महापालिका उपायुक्त, स्थानिक वॉर्ड अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.MLA Amit Satam



     

    मुंबईकरांना आगामी पावसाळ्यात कमीत कमी त्रास व्हावा आणि ३१ मेपर्यंत १००% नाला सफाईचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने ही पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सुमारे ४०–५०% नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

    ते पुढे म्हणाले, पाहणीदरम्यान ज्या ठिकाणी नद्या आणि नाले समुद्राला मिळतात, त्या सर्व ठिकाणी कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी ट्रॅश बूम बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

    महापालिका प्रशासनावर देखरेख ठेवण्यासाठी आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि आमदार वेगवेगळ्या वेळी विविध ठिकाणी पाहणी करत असल्याचेही साटम यांनी सांगितले.

    Approximately 50% of drain cleaning work completed; BMC directed to finish the work by May 31 – Mumbai BJP President and MLA Amit Satam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारांचा आज शपथविधी, पंतप्रधानांची उपस्थिती; कोलकाता परेड ग्राउंडमध्ये 1 लाख लोक येतील; सुरक्षेसाठी 4000 जवान

    Drone Force : भारत- पहिल्यांदाच 50 हजार जवानांची स्वतंत्र ड्रोन फोर्स; बीएसएफ व आयटीबीपीमध्येही असेल, सर्वात आधी हेच हल्ला करतील

    Manipur Border : म्यानमार सीमेवरून आलेल्या अतिरेक्यांनी मणिपूरमध्ये घरे जाळली; पहाटे 4 वाजता हल्ला, लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाले