होळीच्या दिवशी काँग्रेसला आणखी एक झटका, आता आसामच्या ‘या’ नेत्याने सोडला पक्ष

Another blow to Congress on Holi now Assams this leader quits the party

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा; जाणून घ्या काय आहे कारण

विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार भरत चंद्र नारा यांनीही पक्ष सोडला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Another blow to Congress on Holi now Assams this leader quits the party

भारत चंद्र नारा यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. आमदाराने पत्रात लिहिले आहे की, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. यापूर्वी रविवारी त्यांनी आसाम काँग्रेसच्या मीडिया सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भरत चंद्र नारा हे आसाममधील लखीमपूर जिल्ह्यातील नौबोइचा येथून आमदार आहेत. त्यांनी सोमवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. पत्नीला लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Another blow to Congress on Holi now Assams this leader quits the party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात