• Download App
    अमित शहा - योगी कॅबिनेट साठी दोन स्पेशल शो; उत्तर प्रदेशात सिनेमा टॅक्स फ्री!!Amit Shah - Two special shows for Yogi Cabinet; Cinema tax free in Uttar Pradesh!

    सम्राट पृथ्वीराज : अमित शहा – योगी कॅबिनेट साठी दोन स्पेशल शो; उत्तर प्रदेशात सिनेमा टॅक्स फ्री!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : चाणक्य फेम डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा सम्राट पृथ्वीराज याचे खास दोन शो रिलीजपूर्वीच करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या साठी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात साठी हे दोन खास शो झाले. Amit Shah – Two special shows for Yogi Cabinet; Cinema tax free in Uttar Pradesh!

    काल अमित शहा, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान आदी केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीमध्ये सम्राट पृथ्वीराज बघितला. यावेळी केंद्रीय गृह मंत्रालय आणि बाकीच्या मंत्रालयांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यानंतर आज लखनऊ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात साठी सम्राट पृथ्वीराज सिनेमाचा खास शो ठेवला होता. योगी आणि मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा सिनेमा बघितला. त्यानंतर झालेल्या छोटेखानी समारंभात योगी आदित्यनाथ यांनी सम्राट पृथ्वीराज सिनेमा उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केल्याची घोषणा केली.

    भारताचा खरा गौरवशाली इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी सम्राट पृथ्वीराज सिनेमा टॅक्स फ्री करत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

    2014 नंतर भारतीय समाजात सांस्कृतिक राष्ट्रवाद रुजत चालला आहे. भारतीय इतिहासातील गौरवशाली अध्याय पुन्हा उलगडले जात आहेत. सम्राट पृथ्वीराज हा भव्यदिव्य सिनेमा हा त्याचाच एक भाग आहे, असे अमित शहा यांनी काल सिनेमा बघितल्यानंतर सांगितले होते. योगी आदित्यनाथ यांच्या आजच्या भाषणात देखील अमित शहा यांच्या भाषणाचा धागा होता. त्यातूनच त्यांनी सम्राट पृथ्वीराज सिनेमा उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केल्याची घोषणा केली.

    Amit Shah – Two special shows for Yogi Cabinet; Cinema tax free in Uttar Pradesh!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही