वृत्तसंस्था
नवी दिल्ली – मोदी सरकारने अर्थव्यवस्थेतील GDP ची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांनी देशाचा GDP वाढवला आहे म्हणजे गॅस – डिझेल – पेट्रोल यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ केली आहे.After Rahul Gandhi surrounded the Modi government on GDP, many leaders came to Raswanti, new interpretations of GDP !!
मोदी म्हणतात जीडीपी वाढवून 23 लाख कोटी रुपये गोळा केले. मग ते गेले कुठे?* अशी घणाघाती टीका काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केल्यावर भाजपच्या नेत्यांच्या रसवंतीला बहर आला आहे.
राहुल गांधी यांच्या टीकेला काल संबित पात्रांनी CNP असा शॉर्टफॉर्म वापरून प्रत्युत्तर दिले होते. आज मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी GDP चा नवा अर्थ सांगितला आहे. ते म्हणाले, गांधी परिवार GDP चा खरा अर्थ काय समजणार
… त्यांचे G आहे, सोनिया गांधी – राहुल गांधी आणि प्रियांका गांधी D आहे, दिग्विजय सिंग आणि P आहे, पी. चिदंबरम… ते मोदी सरकारच्या काळात GDP वाढल्याचा खरा अर्थ समजू शकत नाहीत, अशी टीका नरोत्तम मिश्रा यांनी केली होती.
काल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी CNP असा शॉर्टफॉर्म वापरून त्याचा अर्थ Corruption, Nepotism & Policy Paralysis असा सांगितला होता. काँग्रेस आणि यूपीएच्या काळात भ्रष्टाचार, भाई भतीजा वाद आणि धोरण लकवा हेच चालले होते. त्यांचे सरकार CNP चा उत्तम नमूना होते, अशी टीका संबित पात्रा यांनी केली होती. आज नरोत्तम मिश्रा यांनी GDP चा नवा अर्थ सांगून काँग्रेसवरील टीकेत भर घातली आहे.
After Rahul Gandhi surrounded the Modi government on GDP, many leaders came to Raswanti, new interpretations of GDP !!