PM Modi : पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले- १२ वर्षांत भारताची जीडीपी दुप्पट, २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर काढले
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांतील भारताच्या विकास प्रवासाचा आढावा घेतला. या काळात भारताने आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचा दावा करत त्यांनी देशातील विविध क्षेत्रांतील बदलांची आकडेवारी मांडली.