अब की बार 400 पार, विरोधकांना भूकंप सहन होणार नाय!!; पंतप्रधानांसमोरच मुख्यमंत्र्यांची बॅटिंग

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : मुंबईतल्या अटल सेतू आणि अन्य विकास प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आज फुल बॅटिंग करून घेतली. महाराष्ट्रात 45 पार आणि देशात अब की बार 400 पार असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीनंतरचा भूकंप विरोधकांना सहन होणार नाही, असे सांगितले. Ab ki bar 400 par says of the Chief Minister in front of the Prime Minister

एकनाथ शिंदे म्हणाले :

लोकसभा निवडणुकीनंतर देशात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. आणि विरोधक तो भूकंप सहन करू शकणार नाहीत. देशात अब की बार 400 पार ही घोषणा मजबूत करण्यासाठी आपली देखील मोठी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे देशात अबकी बार मोदी सरकार आणि महाराष्ट्रात अबकी बार 45 पार हा संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

या एमटीएचएल सागरी सेतूचे भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि आज या ब्रीजचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी करत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

देशामध्ये जशी मोदींची गॅरंटी चालते तसा हा ब्रीज देखील आणखी मजबूत झाला आहे. हा सी ब्रीज 22 किलोमीटरचा आहे. अनेक मोठमोठ्या भूकंपाचे धक्के झेलणयाची ताकद देखील या ब्रीजमध्ये आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा भूकंप होणार आहे, आणि तो विरोधी पक्षांना सहन होणार नाही, असा थेट इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. शिवडी न्हावा शेवा हा फक्त एक मार्ग नाही तर विजयाकडं घेऊन जाणारा विकासाचा महामार्ग आहे.

अन्याय अत्याचार करणाऱ्या अहंकारी रावणाचा संहार करण्यासाठी प्रभू श्रीरांमाच्या सेनेनं समुद्रावर सेतू बनवला. त्याचप्रमाणे या सागरी सेतूच्या निर्माणानं अहंकारी लोकांचा अहंकार धुळीस मिळणार आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील विकासप्रकल्पांसाठी भूमीपूजन आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदींना बोलावतो. तेव्हा तेव्हा ते आमचा उत्साह वाढवण्यासाठी येतात, वेळ देतात. त्यामुळे विकासविरोधी लोकांच्या पोटात दुखतं.

पंतप्रधान मोदी देशभरात सद्भावना आणि सर्वांगीण विकासाचा पूल बांधत आहेत. त्यामुळे अब की बार 400 पार ही घोषणा मजबूत करण्यासाठी आपली देखील मोठी जबाबदारी वाढली आहे. अबकी बार मोदी सरकार आणि महाराष्ट्रात अबकी बार 45 पार हा संकल्प घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचं सरकार बनण्याआधी महाराष्ट्राचा विकास खुंटला होता, सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम सुरु झाले आहे.

Ab ki bar 400 par says of the Chief Minister in front of the Prime Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात