बंगळुरूमधील जलमय अंडरपासमध्ये कार फसल्याने इन्फोसिसच्या अभियंता महिलेचा मृत्यू!


गाडीत सातजण होते आणि सहा जणांना स्थानिकांनी वाचवले.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरु : बंगळुरुमधील केआर सर्कल अंडरपासमध्ये पाणी साचल्याने त्यामध्ये अडकलेल्या कारमधील एका २२ वर्षीय अभियंता महिलेचा रविवारी बुडून मृत्यू झाला. ही घटना कर्नाटकाच्या विधानसौधा पासून काही अंतरावरच घडली.  भानुरेखा (२२) असे मृत महिलेचे नाव असून ती इन्फोसिसमध्ये नोकरीला होती. रविवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस झाल्याने ही दुर्घटना घडली. गाडीत सातजण होते आणि सहा जणांना स्थानिकांनी वाचवले. A woman engineer of Infosys died after her car fell into a flooded underpass in Bangalore

भानुरेखा यांना जवळच्या सेंट मार्था रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रूग्णालयाला भेट दिली आणि पीडितेच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत आणि रुग्णालयात दाखल असलेल्यावंर मोफत उपचाराची घोषणा केली.

“आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील कुटुंबाने एक कार भाड्याने घेतली होती आणि ते बंगळुरूला भेट देण्यासाठी आले होते. भानुरेखा इन्फोसिसमध्ये काम करतात. पावसामुळे अंडरपासवरील बॅरिकेड पडले  होते आणि चालकाने अंडरपास ओलांडण्याचा धोका पत्करला, जे त्याने नव्हते करायला पाहिजे. ” असे सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना सांगितले.

A woman engineer of Infosys died after her car fell into a flooded underpass in Bangalore

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात