• Download App
    केंद्र सरकारचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशातील तीन रेल्वे स्थानकांची नावे बदलली A major decision by the central government the names of three railway stations in Uttar Pradesh have been changed

    केंद्र सरकारचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशातील तीन रेल्वे स्थानकांची नावे बदलली

    जाणून घ्या,  काय करण्यात आला आहे नेमका बदल?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली  : देशातील शहरं आणि रेल्वेस्थानकांची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाने उत्तर प्रदेशातील तीन रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत. यासंदर्भात उत्तर रेल्वेने अधिसूचना जारी केली आहे. A major decision by the central government the names of three railway stations in Uttar Pradesh have been changed

    अधिसूचनेनुसार, प्रतापगड स्टेशन आता माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ जंक्शन असे बदलण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अंतू हे माँ चंद्रिका देवी धाम अंतू आणि बिशनाथगंज हे शनिदेव बिश्नाथगंज रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाईल. प्रतापगडमध्ये तीन प्रमुख धार्मिक स्थळे आहेत, त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

    या मोठ्या निर्णयानंतर ही बाबही समोर येत आहे की, रेल्वे बोर्ड आणखी स्थानकांची नावे बदलू शकते. ज्या शहरात सर्वात मोठे धार्मिक स्थळ असेल त्यानुसार रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. याचवर्षी झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक करण्यात आले.

    राजकारणाचा मार्ग नेहमीच निसरडा, वारंवार घसरण्याची शक्यता, पण…; शिवराज सिंह चौहान यांचे सूचक उद्गार

    मोदींच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. दीनदयाल उपाध्याय रेल्वे जंक्शन ते मुगलसराय, मंडुआडीह रेल्वे स्टेशन ते बनारस रेल्वे स्टेशन, रॉबर्टगंज ते सोनभद्र रेल्वे स्टेशन, अलाहाबाद ते प्रयागराज, फैजाबाद ते अयोध्या. याशिवाय अनेक शहरांच्या नावांमध्येही बदल करण्यात आले आहेत. स्थानक आणि शहरांच्या नावातील या बदलाबाबत विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. आता आगामी काळात किती स्थानके आणि शहरांची नावे बदलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

    A major decision by the central government the names of three railway stations in Uttar Pradesh have been changed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक