• Download App
    Supreme Court गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा

    Supreme Court : गोवा काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!

    Supreme Court

    आठ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Supreme Court  सर्वोच्च न्यायालयाकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. खरंतर, गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी अलीकडेच ती याचिका फेटाळली होतीSupreme Court



     

    ज्यात काँग्रेसने २०२२ मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. याचिका फेटाळताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटले होते की, जर एखाद्या पक्षाचे दोन तृतीयांश आमदार पक्षाशी असहमत असतील तर त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.

    या निर्णयाला आव्हान देत काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तिथेही त्यांची निराशा झाली होती. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांना विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्यास सांगितले

    A big blow to Goa Congress from the Supreme Court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : सर्वाधिक लाइक केलेल्या 10 ट्विट्सपैकी 8 मोदींचे; पुतिन यांना भगवद्गीता भेट देण्याच्या पोस्टची रीच 67 लाख, 2.31 लाख लाईक्स

    Yuvraj Singh Sonu Sood : सट्टेबाजी प्रकरणात युवराज-सोनू सूद यांची मालमत्ता जप्त; मनी लॉन्ड्रिंगमधून पैसे घेतल्याचा आरोप

    IndiGo CEO Pieter : इंडिगो CEO म्हणाले- सर्वात वाईट काळ निघून गेला; ऑपरेशन स्टेबल, नेटवर्कमधील 2200 विमानांची सेवा पूर्ववत