प्रतिनिधी
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार यांचा रविवार, ९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा होता, या दौ-याच्या शेवटी हजारो शिवसैनिक, आमदार खासदार आणि भाविक यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी शरयु नदीची पूजा आणि महाआरती केली. 50 MLAs, thousands of Shiv Sainiks, devotees along with Chief Minister Eknad Shinde’s Maha Aarti of Sharayu River
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेकदा मी दौ-याच्या आयोजनासाठी अयोध्येत यायचो, पण आज मुख्यमंत्री म्हणून मी दौ-याला आलो. येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दौ-याचे उत्तम आयोजन केले. सर्वांच्या सहाय्याने हा दौरा सफल झाला आहे. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. हा राजकारणाचा विषय नाही.
इथे राम मंदिर व्हावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्र होते. मी प्रोटोकाॅल न पाळता लोकांमध्ये गेलो त्यामुळे पोलिसांची गैरसोय झाली, पण जनतेत जाणे हेच माझे टाॅनिक आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे स्वप्न साकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App