प्रतिनिधी
पुणे : जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला उच्च-नीच भेदभाव अमंगळ असल्यास संदेश देऊन समाजात देशभक्तीची चेतना निर्माण केली. ही चेतनाच राष्ट्रभक्ती आणि समाजभक्तीत प्रतिबिंबित झाली. तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीने छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर यांच्यासारख्या महान देशभक्तांना प्रेरणा दिली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे. 11000 crore for development of palanquin routes; 350 km four lane highway to be constructed !!; Prime Minister’s announcement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहूतील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर सभेला संबोधित करताना पालखी मार्गांच्या विकासासाठी सरकार 11000 कोटींचा खर्च करेल. या माध्यमातून 350 किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग 5 टप्प्यांमध्ये आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी महामंडळे 3 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम 3 टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम 5 टप्प्यात करण्यात येईल, अशी माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षा भूमीचाही विकास करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.
अभी कुछ महीनें पहले ही मुझे पालकी मार्ग में 2 राष्ट्रीय राजमार्ग को फोरलेन करने के लिए शिलान्यास का अवसर मिला था। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग का निर्माण 5 चरणों में होगा और संत तुकाराम पालकी मार्ग का निर्माण 3 चरणों में पूरा किया जाएगा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/RNTOdky942 — ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2022
अभी कुछ महीनें पहले ही मुझे पालकी मार्ग में 2 राष्ट्रीय राजमार्ग को फोरलेन करने के लिए शिलान्यास का अवसर मिला था। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग का निर्माण 5 चरणों में होगा और संत तुकाराम पालकी मार्ग का निर्माण 3 चरणों में पूरा किया जाएगा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/RNTOdky942
— ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2022
देहूत येणे हे माझे भाग्य
देहू हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ आहे. अशा या देहूच्या पवित्र तीर्थभूमीवर मला येता आले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘जेथे नांदे देव पांडुरंग, धन्य ते क्षेत्रवासी लोक’, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू संस्थानचे प्रमुख नितीन महाराज मोरे, मारुतीबाबा कुरेकर, आचार्य तुषार भोसले आदी नेते उपस्थित होते.
सरकारच्या योजना समाजातल्या सर्व घटकांपर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा भगवत भक्तीतून आणि संत परंपरेतूनच सरकारने घेतली आहे, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी या वेळी दिली. या वेळी पंतप्रधान मोदींनी अनेक अभंग मुखोद्गत असल्यासारखे वारकरी संप्रदाय समाजा समोर सादर केले.
https://youtube.com/shorts/6MuP-00PyiQ?feature=share
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App