विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला अथवा न घेतला तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे “पितामह” राहतील आणि राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी अथवा अध्यक्षपदी दुसऱ्या कुणाला नेमतील, याचा जवळपास निश्चित झाले आहे.Will sharad Pawar hold organisational election in NCP to elect the new president or working president??
निवृत्तीची घोषणा करताना पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांची “कॉपी” मारल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेवरची सुटत चाललेली पकड पक्की करण्याकरता दोनदा शिवसेनाप्रमुख पद सोडायची धमकी दिली होती. पण त्यानंतर शिवसैनिकांनी मोठा हलकल्लोळ करत बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख पदावर पुनर्स्थापना केली होती. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना पवारांनी बाळासाहेबांचीच “कॉपी” केली. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाची अथवा कार्याध्यक्षाची निवड करताना ते सोनिया गांधींची “कॉपी” करून नवे “मल्लिकार्जुन खर्गे” नेमतील का??, असा सवाल आहे.
काँग्रेसमध्ये गांधी घराण्यापैकी कोणीही अध्यक्ष नको हे स्वतः सोनिया गांधींनीच निश्चित करून ज्या पद्धतीने मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पारड्यात आपला कौल देऊन त्यांना लोकशाही मार्गाने काँग्रेस संघटनेच्या निवडणूकीद्वारे अध्यक्ष केले, तसा पर्याय शरद पवार निवडतील का??, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पवारांचा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर दृढ विश्वास आहे, असे त्यांचे समर्थक मानतात. त्यामुळे सोनिया गांधींचा “लोकशाहीचा मार्ग” पवार अवलंबत राष्ट्रवादी काँग्रेस साठी नवे “मल्लिकार्जुन खर्गे” बाहेरून निवडणार की घरातलाच निवडणार??, असा सवाल तयार झाला आहे.
पवारांनी त्यासाठी 11 जणांची कमिटी नेमली आहे. या 11 जणांच्या कमिटी पुढे काही नावे जरूर आहेत. त्यामध्ये अर्थ कमिटी मध्येच असलेले खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नाव आघाडीवर आहेत. तरी देखील पक्षातला वाद टाळण्यासाठी ही कमिटी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची अथवा कार्याध्यक्ष पदाची संघटनात्मक निवडणूक जाहीर करून नवा धक्का देईल का??, असाही सवाल आहे.
रेकॉर्ड वरचे राजीनामे
त्याचबरोबर पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना दिलेला धक्का अजून अनेकांना पचत नाही. त्यामुळे पवारांच्या इच्छेविरुद्ध राष्ट्रवादीत राजीनामा सत्रही सुरू झाले आहे. अनेक जिल्हाध्यक्षांनी, वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी आपापले राजीनामा पत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने पाठवून दिली आहेत. ती अर्थातच नामंजूर होतील, असे आधीच अजितदादांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाहीर केले आहे, पण आपला राजीनामा शरद पवारांच्या समर्थनासाठी रेकॉर्डवर राहावा, यासाठी अनेकांनीही राजीनामा पत्रे धाडून दिली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App