मालमत्ता कर माफीबाबत दुजाभाव का ?मुंबईप्रमाणे अन्य शहरातील जनतेची अपेक्षा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफ केला आहे. त्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण, मुंबई म्हणजे अख्खे राज्य नसून राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातील घरांच्या मालमत्ता करात माफी का दिली जात नाही. मुंबईवर प्रेम करा, पण, अन्य शहरातील लोकांबाबत दुजाभाव का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. मुंबईतील निर्णयामुळे अन्य शहरातील नागरिकांची सरकारकडून कर माफीची अपेक्षा वाढली आहे. Why discrimination with property tax waivers ?;Expectations from people in other cities like Mumbai



राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात माफी देण्याचे वचन दिले. आता सत्तेवर येऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही. आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना मुंबईला एक न्याय आणि अन्य शहरातील महापलिका क्षेत्रातील लोकांना दुसरा न्याय, हा दुजाभाव का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Why discrimination with property tax waivers ?;Expectations from people in other cities like Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात