एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकरचा संबंध काय?, इथे सर्वच मराठी ; संजय राऊत यांचा सवाल

बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. इथे कुणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.What is the relation of Kranti Redkar in NCB case ?, All Marathi here; Question by Sanjay Raut


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिले होते.या पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊत म्हणले की , क्रांती रेडकर यांचा या प्रकरणाशी संबंधच काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकर यांच्यावर कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केलीय असं माझ्या पाहण्यात नाही.

पुढे संजय राऊत मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना, ते काय अमराठी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.



इथे सर्वच मराठी आहेत

दिल्लीतून केंद्रीय तपास यंत्रणांचं ज्या प्रकारे आक्रमण सुरू आहे, कारण नसताना अनेकांच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहे. कालही देगलूरमध्ये निवडणूक सुरू असताना धाडी पडल्या. अशोक चव्हाण मराठी नाहीत का? अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथे सर्वच मराठी आहेत. प्रश्न सत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे. खरं आणि खोट्याची लढाई आहे. पाहू आता काय होते ते, असं त्यांनी सांगितलं.

बाळासाहेब नसले तरी उद्धव ठाकरे आहेत

संजय राऊत म्हणाले की , क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. इथे कुणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी समीर वानखेडेंबाबत बोलण्यास नकार दिला. गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. त्याविषयी मी फार बोलणार नाही. कारण तो सरकारचा विषय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

What is the relation of Kranti Redkar in NCB case ?, All Marathi here; Question by Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात