• Download App
    Uddhav Thackeray group × Eknath Shinde group battle; Hearing in the Supreme Court tomorrow

    उद्धव ठाकरे गट × एकनाथ शिंदे गट लढाई; उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या 16 बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कायदेशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी शिवसेनेने अॅड. देवदत्त कामत यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता शिंदे गटानेही सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या याचिकेला चॅलेंज करणारी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता शिंदे गटही कायदेशीर कारवाईला तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  Uddhav Thackeray group × Eknath Shinde group battle; Hearing in the Supreme Court tomorrow

    कायदेशीर लढाईला सुरुवात

    शिंदे गटातील 16 आमदारांनी घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी या याचिकेत केली आहे. पण याविरोधात आता शिंदे गटानेही याचिका दाखल केली असून, या याचिकेवर सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदाबाबत ही याचिका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही लढाई आता कायद्याच्या चौकटीत लढली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



     

    शिंदे गटाला मान्यता नाही

    दोन-तृतीयांश बंडखोर आमदारांचं संख्याबळ असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती सध्या पसरवण्यात येत आहे. पण दोन-तृतीयांश सदस्यांचे संख्याबळ तेव्हाच ग्राह्य धरले जाते जेव्हा या सदस्यांचा गट दुस-या गटात समाविष्ट होतो. शिंदे गटाकडून अशाप्रकारचे कुठलेही विलीनीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या गटाला अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत मान्यता नाही. जोपर्यंत शिंदे गट कुठल्याही पक्षात सहभागी होत नाही तोपर्यंत त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे वकील अॅड.कामत यांनी दिली आहे.

    Uddhav Thackeray group × Eknath Shinde group battle; Hearing in the Supreme Court tomorrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर