युवतीच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने दिले सिगारेटचे चटके


युवतीच्या घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला असून तिने विरोध केल्याने तिला आरोपींनी सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मध्ये घटना घडली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. Two unkonwn person enter into one girl room and molestation her but she opposed them accused torcher her


विशेष प्रतिनिधी

पुणे : एकेकाळी महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणा-या पुणे शहरात आता महिला घरातही सुरक्षित नाहित. हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये राहणा-या एका तरुणीवर दोघांनी पाण्याचा कॅन घेण्याच्या बहान्याने घरात प्रवेश तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दोघांना तरुणींनी प्रतिकार केला. मात्र, त्यातील एका तरुणाने तरुणीला पडकून दिला जाळून टाकण्याची धकमी देत सिगारेटचे चटके दिले.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असूून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. पिडीत तरुणी ही रविवारी घरी होती. या वेळी आरोपी तिच्या घरी आले. त्यांनी तिला घरातील पाण्याचा कॅन घ्यायचा आहे असे सांगत घरात प्रवेश केला. दरम्यातील यातील एकाने पिडीतेला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला प्रतिकार करत घरातील झारा फेकून मारला. आरोपीने त्याच्या दुस-या साथीदाराला बोलावून घेतले. दोघांनीही तिला पडकून तिच्यावर जबरदस्ती करण्याच्या प्रयत्न केला. विरोध केल्यास थेट जाळूून टाकण्याची धमकी पिडीतेला दिली. यावेळी दुस-या आरोपीने त्याच्या हातातील सिगरेटचे चटके पिडीतेला दिले. पिडीतेने आरडा ओरडा केल्याने आरोपी तेथून पसार झाले. पिडीता या घटनेमुळे मानसिक धक्यात आहे. तिने या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. थेट घरात घसून झालेल्या या प्रकारामुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Two unkonwn person enter into one girl room and molestation her but she opposed them accused torcher her

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात