विशेष प्रतिनिधी
पुणे : कोव्हीशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचे अंतर हवे. तिसरा बूस्टर डोस आवश्यक आहे.मात्र कॉकटेल लसीच्या मी विरोधात आहे. त्यामुळे लसींची परिणामकारकता कमी होऊ शकते, असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.Two doses of Covishield vaccine should be spaced two months apart, a third booster dose is required, Cyrus Punawala said.
पुण्यात टिळक सन्मान पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर ते बोलत होते. पुनावाला म्हणाले, कोव्हीशिल्डचे दोन डोस घेतल्यावरही बुस्टर डोसची गरज पडेल. मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे.
तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असेल लसींची निर्यात सुरू केली पाहिजे.अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत.पुण्यात जास्त कोरोना, इथे लस जास्त द्याव्या लागतील मात्र, मोदी सरकारने उत्तर दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, कोव्हीशिल्डच्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचे अंतर हवे.
कोरोना झालेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी भारतात वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होईल का? या प्रश्नावर ते म्हणाले, सरकार थापा मारत आहे. महिन्याला १० कोटी डोसचे उत्पादन ही सोपी गोष्ट नाहीत. तरी आम्ही करत आहोत. दर वर्षी 110 कोटी देण्याचे उद्दिष्ट आहे.कोरोना आहे तोवर लस घेत राहावी लागेल.
मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केलीय. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको, पण मी बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील १७० देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिले आहेत असे पुनावाला म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App