
खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिले आहे जोरदार प्रत्युत्तर
प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे 40 आमदार भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार तोंडसुख घेतले. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जशासतसे प्रत्युत्तर दिले. Tomorrow Uddhav Thackeray can call Anil Deshmukh and Nawab Malik freedom fighters Maharashtra CM Eknath Shinde
”त्यांनी (उद्धव ठाकरे) स्वतःमध्ये डोकावले पाहिजे. आज जागा वेगळी होती, नाहीतर त्यांचे शब्द आणि आरोप तेच होते. उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकतात. त्यांच्या आरोपांना आम्ही विकासकामे करून उत्तर देऊ.” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
He (Uddhav Thackeray) should look within himself. Today the place was different, otherwise, his words & allegations were same. Tomorrow he can call Anil Deshmukh & Nawab Malik freedom fighters. We'll respond to their allegations by doing development works: Maharashtra CM (05.03) https://t.co/zhhbDRGA8T pic.twitter.com/SsQ7eZQdeK
— ANI (@ANI) March 5, 2023
याशिवाय, ”आम्ही राज्याला पुढे नेऊ. जनता पाहत आहे आणि त्यांना विकास कामे हवी आहेत आणि एकमेकांना शिव्या घालण्यात त्यांना रस नाही.” असंही उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
शिवसेना हा पक्ष माझ्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आहे. तो निवडणूक आयोगाने स्थापन केला नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह चोर गटाला दिले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. त्याचवेळी जनतेने जर आपल्याला सांगितले तर आपण एका मिनिटात घरी जाऊ. वर्षा बंगला सोडला तेव्हा देखील मी सत्तेला शिकून राहिलो नव्हतो. तसेच जर जनतेने सांगितले तर मी पुन्हा घरी जाईन पण हा फैसला मी निवडणूक आयोग भाजप अथवा चोर गटावर सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता.
Tomorrow Uddhav Thackeray can call Anil Deshmukh and Nawab Malik freedom fighters Maharashtra CM Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला डिवचले
- ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी हिंडेनबर्ग अहवाल फेटाळला : म्हणाले- अदानी समूहावरील अहवाल केवळ आरोप; दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष
- भारतात होणार छोट्या विमानांची निर्मिती : एम्ब्रेयर आणि सुखोईच्या उत्पादनासाठी चर्चा, दुर्गम भागात होणार फायदा