प्रतिनिधी
मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. त्यात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही, असे वक्तव्य केले. अबू आझमींच्या या विधानावर माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोणावळ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आझमींवर सडकून टीका केली आहे. Throw Abu Azmi out of Maharashtra who called Aurangzeb good
संभाजीराजे म्हणाले, की हा अबू आझमी महाराष्ट्रात का राहतोय?, असल्या माणसला पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे, असे बोलायची त्याची हिंमत कशी काय होते? शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून बाहेर काढण्याच ठरवलं होतं आणि हे असे माणसं महाराष्ट्रात राहतात हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी अबूला सांगायला हवे की तुला जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू, फुले आंबेडकरांचं आणि सगळ्या संतांचं नाव घ्यायला पाहिजे, काय त्या औरंगजेबच नाव घेतोय!!
– अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य
माध्यमांशी बोलताना अबू आझमी म्हणाले होते, की औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबाबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणे त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही, असा दावा आझमींनी केला होता.
आजमींच्या याच वक्तव्यावरून संभाजी राजे यांनी त्यांना महाराष्ट्रातून बाहेर फेकले पाहिजे, अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App