थरारक व्हिडिओ : अवघ्या काही फुटांवर थांबला मृत्यू, लोकलखाली आत्महत्या करणार होती व्यक्ती, चालकाने लावला इमर्जन्सी ब्रेक

Thrilling video Death stopped just a few feet away, Emergency brake applied by the Train driver while Man was about to commit suicide under the locomotive

Train driver : मुंबईच्या शिवडी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक घटना कैद झाली आहे, जी काही काळासाठी तुमचा श्वास रोखून धरण्यास भाग पाडेल. रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती वेगवान लोकल ट्रेनसमोर आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर पडलेला दिसत आहे, परंतु लोकल ट्रेनच्या मोटरमनने त्याच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचवला. रुळावर पडलेल्या व्यक्तीपासून अवघ्या काही फुटांवरच रेल्वे थांबवण्यास मोटरमनला यश आले. Thrilling video Death stopped just a few feet away, Emergency brake applied by the Train driver while Man was about to commit suicide under the locomotive


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईच्या शिवडी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक घटना कैद झाली आहे, जी काही काळासाठी तुमचा श्वास रोखून धरण्यास भाग पाडेल. रेल्वे मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती वेगवान लोकल ट्रेनसमोर आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर पडलेला दिसत आहे, परंतु लोकल ट्रेनच्या मोटरमनने त्याच्या सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचा जीव वाचवला. रुळावर पडलेल्या व्यक्तीपासून अवघ्या काही फुटांवरच रेल्वे थांबवण्यास मोटरमनला यश आले.

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक मोटरमनच्या कामाचे कौतुक करत आहेत. त्याचा रेल्वेकडून सन्मानही करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेला व्हिडिओ शनिवारी सकाळी 11.45 वाजेचा आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवरून निष्काळजीपणे चालताना दिसत आहे. यादरम्यान, वेगात लोकल ट्रेन त्याच्या जवळ येताच ती व्यक्ती अचानक रुळांवर पडली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पडून असताना त्या व्यक्तीने आपली मान रुळावर ठेवली आणि बाकीचे धड दोन रुळांच्या मध्ये नेले. मात्र, लोको पायलटने तो माणूस रुळावर पडलेला पाहून इमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे रेल्वे रुळांवर तत्काळ थांबली आणि अनर्थ टळला. व्हिडिओमध्ये रुळावर पडलेल्या व्यक्तीला पाहून तीन आरपीएफ जवानही धावताना दिसत आहेत.

रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

रेल्वे मंत्रालयाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मोटरमनने केले कौतुकास्पद काम: मुंबईच्या शिवडी स्टेशनवर, मोटरमनने एका व्यक्तीला रुळावर पडलेले पाहिले, त्याने तत्परतेने आणि समजूतदारपणाने आपत्कालीन ब्रेक लावून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. तुमचे जीवन अनमोल आहे, कोणीतरी तुमची घरी वाट पाहत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 6 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर सुमारे एक हजार लोकांनी री-ट्विट केले आहे.

Thrilling video Death stopped just a few feet away, Emergency brake applied by the Train driver while Man was about to commit suicide under the locomotive

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात