विशेष प्रतिनिधी
नागपूर : जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी मुलगा ३२ वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते. परंतु, त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीला सासरी राहणे कठीण झाले. परिणामी, तिने या घटनेच्या तीन वर्षापूर्वी घटस्फोट घेतला. The man who raped the mother got Life imprisonment and a fine of five thousand rupees
पीडित आई धुणीभांडी करून जीवन जगते. ती आरोपीचीही काळजी घेत होती. असे असताना २१ जून २०२१ रोजी मध्यरात्री आरोपीने आईलाच वासनेची शिकार केले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांचे बयान आणि डीएनए अहवाल यावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.
The man who raped the mother got Life imprisonment and a fine of five thousand rupees
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात उन्हाचा चटका जाणवतोय; शिवरात्रीनंतर कडक उन्हाळा पडणार
- U P election 2022 : आदित्य – राऊतांसह शिवसेना नेत्यांच्या उत्तर प्रदेशात गर्जना; राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत कुठे…??
- Income raids : मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!!
- एसटी विलीकरणाबाबत आज पुन्हा सुनावणी; कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची सुनावणीकडे नजर