• Download App
    जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा । The man who raped the mother got Life imprisonment and a fine of five thousand rupees

    जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी मुलगा ३२ वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते. परंतु, त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीला सासरी राहणे कठीण झाले. परिणामी, तिने या घटनेच्या तीन वर्षापूर्वी घटस्फोट घेतला. The man who raped the mother got Life imprisonment and a fine of five thousand rupees



    पीडित आई धुणीभांडी करून जीवन जगते. ती आरोपीचीही काळजी घेत होती. असे असताना २१ जून २०२१ रोजी मध्यरात्री आरोपीने आईलाच वासनेची शिकार केले. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई व इतर साक्षीदारांचे बयान आणि डीएनए अहवाल यावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.

    The man who raped the mother got Life imprisonment and a fine of five thousand rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!