वडीलांकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रतिनिधी

पुणे,: हडपसर परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील १४ वर्षीय मुलीवर तिच्या वडीलांनीच बळजबरीने शारिरिक संबंध करत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय आराेपीला हडपसर पाेलीसांनी अटक केली असून त्याच्या विराेधात ३० वर्षीय पत्नीने पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे.The father raped the minor girl

सदर अल्पवयीन मुलगी राहत्या घरात झाेपलेली असताना वडीलांनी झाेपेत तिचा हात आढूनतिला स्वयंपाक खाेलीत नेले. त्याठिकाणी तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध करुन सदर प्रकार अाईला सांगितला तर तुला व तुझ्याआईला जिवे ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली.



त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुध्दा वडीलांनी पत्नीला घराबाहेर हाकलून देत अल्पवयीन मुलीसाेबत जबरदस्तीने शारिरिक संबंध केला.याबाबत हडपसर पाेलीस पुढील तपास करत आहे.

डाॅक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग

काेंढवा परिसरातील तांबाेळी क्लिनिक येथील डाॅक्टर सुहेल तांबाेळी (वय-३२) यांनी त्यांच्या क्लिनिक मध्ये आलेल्या महिलेशी जवळीक साधत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आराेपीवर काेंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलीसांकडे २२ वर्षीय महिलेने तक्रार दिली अाहे. सदर पिडित महिला अाजारी असल्याने उपचार घेण्यासाठी तांबाेळी क्लिनिक येथे गेली हाेती. त्यावेळी डाॅक्टरने कमरेवर इंजेक्शन देण्याचे बहाण्याने तिच्या शरिराला वेगवेगळया ठिकाणी र्स्पश करत तिचा विनयभंग केला. त्याचप्रमाणे तिला जवळ अाेढून घेत तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केले आहे..

The father raped the minor girl

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात