ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार; पवारांचा बारामतीत विश्वास

प्रतिनिधी

बारामती – महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत व्यक्त केला. Thackeray govt will complete 5 years term, claims sharad pawar in baramati

ठाकरे सरकार तीन पक्षांच्या मतभेदांमधून पडेल, असा दावा भाजपचे नेते करीत असतात. त्यावर शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. ठाकरे सरकार निश्चितच ५ वर्ष पूर्ण करेल, याबाबत मनात अजिबात शंका नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की तीन पक्षांचे सरकार हे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. हे सरकार सहजपणे ५ वर्ष पूर्ण करेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.



तीन पक्षांचे सरकार असल्यावर काही गोष्टींवर मतभेद स्वाभाविक आहेत. ते सोडविण्यासाठी यंत्रणा असावी, यासाठी तिन्ही पक्षांमधून प्रत्येकी दोन अशा एकूण सहा जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यानंतर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि अजित पवार यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार ठाकरे सरकारमध्ये उद्भवणार्‍या मतमतांतरावर हे मंत्री समन्वय साधतात, याची आठवण पवारांनी करून दिली.

Thackeray govt will complete 5 years term, claims sharad pawar in baramati

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात