प्रतिनिधी
पुणे : सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आज त्यांची न्यायालयात व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. ते शिक्षक पात्रता चाचणी, टीईटी घोटाळ्यातील आरोपी, आयएएस अधिकारी आहेत. Sushil Khodvekar contracted corona VC hearing of TET scam accused
पोलिसांनी त्यांची कोठडी कायम ठेवण्याची मागणी केली. सुशील खोडवेकर यांचे वकील अमोल डांगे यांनी जामिनासाठीअर्ज दाखल केला. शिक्षण विभागातील आस्थापना विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली होती.
आज त्यांची पोलीस कोठडी संपणार होती. मात्र, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्यामुळे त्यांची व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App