विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय युद्ध नौका विक्रांतच्या कथित घोटाळ्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर किरीट सोमय्या काल प्रकट झाले आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उद्या बाहेर काढणार, असा इशारा त्यांनी दिला. Somaiya – Raut: Kirit Somaiya – Sanjay Raut’s gun on each other again !!
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील किरीट सोमय्या यांनी संयम सोडू नये. एका प्रकरणात दिलासा मिळाला म्हणून फुशारकी मारू नये. त्यांची आणखी प्रकरणे बाहेर येणार आहेत, असा इशारा दिला आहे.
विक्रांतच्या कथित घोटाळा प्रकरणात अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या दोन-तीन दिवस “गायब” होते. सत्र न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. परंतु, मुंबई हायकोर्टाने त्यांचा तोच अर्ज मंजूर केला आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी उद्या ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. त्याच वेळी ते दोन दिवस कुठे “गायब” होते याचा खुलासाही करणार आहेत.
अनिल परब, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव यांच्या प्रकरणात गती मिळणार. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या कंपनीत उद्धव,रश्मी, आदित्य – तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांनी किती मनी लॉड्रिंग केले. ह्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार, असे ते म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शिवराळ भाषेत किरीट सोमय्या यांच्यावर शरसंधान केले असून स्वतः शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा, असे उद्गार काढले आहेत. किरीट सोमय्या यांनी संयम राखावा. त्यांची आणखी काही प्रकरणे बाहेर येणार आहेत, असे ते म्हणाले. त्याच वेळी फक्त भाजपच्याच लोकांना कोर्टात अटकपूर्व जामीन कसा काय मिळतो?, असा खोचक सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App