प्रतिनिधी
मुंबई / नागपूर : महाविकास आघाडीच्या सरकारवर शिवसेना आणि काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांची नाराजी उफाळून आली असताना या नाराजीच्या आगीत भाजपने तेल ओतायला सुरुवात केली आहे.Shivsena – Congress Unrest: Shiv Sena – BJP’s oil in the fire of Congress MLAs’ displeasure; MLA to blow up NCP; Bavankule’s Sharasandhan
निधी वाटपावरून शिवसेनेचे 25 पेक्षा जास्त आमदार नाराज आहेत तर महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर विशेषतः काँग्रेस मंत्र्यांवर काँग्रेसचे 25 आमदार नाराज असल्याच्या बातम्या आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांच्या नाराजीला वेगळी वाट करून दिली आहे.
निधी वाटपात राष्ट्रवादीकडून अन्याय
राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या आमदारांना जास्त निधी देऊन मुद्दामून शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना नाराज करत आहे. हा त्यांचा डाव आहे. कधीतरी आमदारांच्या संतापाचा स्फोट व्हावा, अशीच राष्ट्रवादीचे अपेक्षा आहे, असे शरसंधान रावसाहेब पाटील दानवे यांनी मुंबईत साधले आहे, तर नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व शिवसेना आणि कॉंग्रेस आमदार फोडत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीची खैरात करून शिवसेना आणि काँग्रेसचे आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस मुद्दामून टोचत आहे.
100 पेक्षा जास्त जागा पुढच्या विधानसभेत निवडून आणायचा त्यांचा डाव आहे. यासाठी त्यांना बाकीच्या पक्षांमध्ये विशेषतः शिवसेना आणि काँग्रेस मधले आमदार फोडायचे असल्यानेच ते मुद्दामून निधी वाटपात दुजाभाव करत आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी आम्हाला जास्त निधी मिळाला तुम्हाला तुमच्या पक्षामुळे निधी मिळत नाही असे डिवचण्याचे राष्ट्रवादीचे नेतृत्व आमदारांना सुचवत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“25” आकड्याचे गौडबंगाल!!
शिवसेनेच्या 25 आमदारांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात उघडपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. विधानसभा अधिवेशनाला हजर राहण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. परंतु, अजित पवार यांनी 2000 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे सांगून वेळ मारून नेली, असे शरसंधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अजितदादांवर साधले आहे.
सोनियांकडे मागितली दाद
काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेसचाच मंत्र्यांविरोधात थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे दाद मागितली आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब पाटील दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या आमदारांच्या नाराजीच्या आगीत तेल ओतण्याचे पुरेपूर काम केलेले दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App