शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पक्षाला ठोकणार रामराम


विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेतील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत.या नाराज आमदारांच्या यादीत तानाजी सावंत यांचं देखील नाव आहे.सध्याच्या परिस्थीतीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पक्ष सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Shiv Sena MLA Tanaji Sawant will hit the party

ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे खासदार संभाजीराजे आले आहेत. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा सुरू आहे.



त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तानाजी सावंत यांनी काल आपली पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांच्यासोबत बैठक सुरू आहे.त्यानंतर थोड्याच वेळात तानाजी सावंत आपला निर्णय सगळ्यांसमोर जाहीर करण्याची शक्यता आहे.

सध्या ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंचा पराभवाचा केला परंतु, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर

त्यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, त्यांनी एक इशारा दिला आहे की,येत्या तीन– चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलणार आहेत. पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार आहे.

Shiv Sena MLA Tanaji Sawant will hit the party

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात