रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याचा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटीलांनी केला निषेध

पाटील म्हणले की , माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुक्ताईनगरात अनेक महिला ग्रामसेवक, तलाठी आहेत.Shiv Sena MLA Chandrakant Patil protested against the attack on Rohini Khadse0


विशेष प्रतिनिधी

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला.रोहिणी खडसे यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.मुक्ताईनगरमधील चांगदेव भागात रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यात जुगलबंदी रंगली होती.त्यामुळे राजकीय डावपेचातून हा हल्ला झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.



यावेळी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.पाटील या हल्ल्याची विधानसभेत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील करणार आहेत.’हा हल्ला कुणी केला? या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी व कठोर कारवाई करावी अशी मागणी मी आज विधानसभेत करणार आहे’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

‘रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने धक्का बसला. या हल्ल्यामुळे पावनभूमी असलेल्या मुक्ताईनगरच्या परंपरेला धक्का बसला आहे’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुढे पाटील म्हणले की , माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुक्ताईनगरात अनेक महिला ग्रामसेवक, तलाठी आहेत. महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकारी देखील आहेत.अशा मतदारसंघात पहिल्यांदाच महिलेवर हल्ल्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे’, अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Shiv Sena MLA Chandrakant Patil protested against the attack on Rohini Khadse

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात