प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे आमदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे, पण वेगवेगळ्या मुद्द्यांवरून.Shiv Sena MLA and BJP target Sharad Pawar
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे त्यांनी शरद पवार यांच्यावर रयत शिक्षण संस्थेतील काही व्यवहारांसंदर्भात निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी आपल्या घरातल्याच पुढच्या पिढीकडे वारसा हक्काने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद देऊ नये. कारण ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वांविरोध होईल, अशी टिप्पणी केली आहे. रयत शिक्षण संस्थेचे संदर्भात अनेक बाबींवर महेश शिंदे यांनी बोट ठेवले आहे.
रयत शिक्षण संस्थेत पेंटिंगचे काम वर्षानुवर्षे बारामतीतल्या एकाच व्यक्तीकडे देण्यात येत असते. साताऱ्यात पेंटर नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील नऊ सदस्य रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर आहेत याकडेही महेश शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. खासदार उदयनराजे भोसले साताऱ्याचे असूनही त्यांना शिक्षण संस्थेत स्थान नाही. रयत शिक्षण संस्थेचे देणगीच्या नावाखाली खाजगीकरण करणे योग्य नाही. देणगी दिली म्हणून मालकीहक्क दाखवण्याचे काही कारण नाही.
रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी एका दिवसात 100 कोटी रुपये उभे करू शकतात, अशी वक्तव्ये देखील महेश शिंदे यांनी केले आहेत. महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर महेश शिंदे यांनी थेट शरद पवारांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर साधलेल्या निशाणाला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी शरद पवार यांनी कोणत्याच घटनात्मक पदावर राहून राज्यातल्या एसटी अधिकाऱ्यांची बैठक घेतली?, असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पदाची सूत्रे शरद पवार यांच्याकडे सोपविले आहेत का?, असा सवाल त्यांनी केला. त्याहीपेक्षा महत्त्वाचा असा सवाल शरद पवार घटनात्मक पदावर नसताना ते अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?, असा सवाल आमदार राम कदम यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App