‘पुणे टू गोवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत करत असून हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.Shalu from Fandry will soon be seen in the Bollywood movie ‘Pune to Goa’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री चित्रपट चांगलाच गाजला होता.दरम्यान या चित्रपटातील शालू ही प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच राज्य करत होती.फॅन्ड्री चित्रपट नंतर आता ही शालू पुन्हा चर्चेत आली आहे. चर्चेचं कारण म्हणजे आता ही शालू म्हणजेच राजेश्वरी खरात बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.लवकरच ‘पुणे टू गोवा’ या बॉलिवूड चित्रपटात शालू झळकणार आहे.
फॅन्ड्री फेम जब्या ऊर्फ सोमनाथ अवघडेचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन! तानाजी गालगुंडे आणि सोमनाथ अवघडे यांचा ‘फ्री-हीट दणका’ लवकरच होणार रिलीज
‘पुणे टू गोवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत करत असून हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.कथा विनोदी शैलीची असली तरी, यात थ्रीलर आणि सस्पेन्सही पाहायला मिळणार असल्याचे कळते आहे.पुणे ते गोवा या रोमांचक प्रवासावर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे.राजेश्वरी नेहमीच सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App