सेवा ही संघटन : ‘तौक्ते’चा तडाखा-महाराष्ट्र संकटात ; मुख्यमंत्री ठाकरे घरात-फडणवीस कोकणात

  • Work from home Vs Ground report :देवेंद्र फडणवीस दोन दिवसाचा कोकण दौरा करणार, पंतप्रधान मोदीही हवाई पाहणी करण्याची शक्यता.

  • देवेंद्र फडणवीस उद्या रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तर परवा रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तौत्के चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात आणि संपूर्ण जिल्ह्यात वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे.याची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २ दिवसांचा दौरा करणार आहेत. उद्या आणि परवा असा २ दिवस फडणवीसांचा पाहणी दौरा असणार आहे.कोरोना काळात महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही घरा बाहेर पडले नाहीत केवळ व्हिडीओ आणि फेसबुकच्या माध्यमांतून ते घरातून  घराघरात पोहचले .दुसरीकडे कोरोना काळात न थांबता अहोरात्र माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी झटत आहेत
SEWA HI SANGHTAN : ‘Taukte’ strikes – Maharashtra in crisis:CM Thackerays work from home-Fadnavis in Konkan

त्यात उद्या फडणवीस रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तर परवा रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही येत्या दोन दिवसांत नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली होती. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती.

मात्र, ‘गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे!’, असं ट्वीट करत फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केलीय.

SEWA HI SANGHTAN : ‘Taukte’ strikes – Maharashtra in crisis:CM Thackerays work from home-Fadnavis in Konkan

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात