विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : बीज बँक देशातील प्रत्येक गावांत तयार करावी, असे आवाहन पद्मश्री, बीज माता राहीबाई पोपरे यांनी केले.Seed bank should be in each village
संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला येथे गागरे बंधू यांनी उभे केलेल्या ग्राममंदिराचे लोकार्पण कीर्तनकार इंदौरीकर महाराज व बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात हजारो ग्रामगीतेच्या प्रती वाटल्या व महाराष्ट्रातील ३० हजार खेड्यामधे ग्रामगीता पोहचवनार असल्याचे गागरे बंधू यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे जनार्दन आहेर, राष्ट्रवादीचे नेते आशोकराव भांगरे,सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई भीगवत, गागरे बंधु व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App