प्रतिनिधी
नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे पाचव्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यावर मात करून विजयी झाले. ते अपक्षच राहणार पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार की भाजपचा राजमार्ग निवडणार??, या प्रश्नाची उत्तरे ते 4 फेब्रुवारीला देणार आहेत. Satyajit tambe’s victory in maharashtra legislative council elections paved the way for dr. Jayashri balasaheb thorat’s assembly Elections
मात्र त्यांच्या विधान परिषद निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात – जैन यांचा संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्याची बातमी आहे. 2024 मध्ये डॉ. जयश्री थोरात या कदाचित संगमनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशी अटकळ आतापासून बांधली गेली आहे. त्या त्या भाजपमध्ये जावोत अथवा काँग्रेसमध्ये राहोत, त्यांचा कोणत्याही दिशेने विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांच्या काँग्रेस मधून बाहेर पडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते विजयापर्यंत सर्व राजकीय घडामोडींवर बाळासाहेब थोरात यांनी मौन बाळविण्याचे बोलले गेले आहे. बाळासाहेब थोरात यांची मूकसंमती याचाच राजकीय अर्थ भाचा सत्यजित तांबे विधान परिषदेवर विजयी करून त्यांनी आपली कन्या जयश्रीचा विधानसभेचा मार्ग मोकळा केला असा काढला जात आहे.
अर्थात डॉ. जयश्री थोरात यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी स्वतः बाळासाहेब थोरात यांना निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेऊन डॉ. जयश्री यांना पुढे चाल द्यावी लागेल. हे बाळासाहेब थोरात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत करतील का??, हाही प्रश्न आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App