प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतल्या प्रवीण राऊत यांच्या घोटाळ्यांवरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या नंतर संजय राऊत देखील संतापले आहेत. त्यांनी आम्ही नव्हे, तर भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुख यांच्या शेजारच्या कोठडीत जातील, असा पलटवार केला आहे.Sanjay Raut said, three and a half people of BJP will go inside
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजप वर जोरदार तोंडसुख घेतले आहे. आता डोक्यावरून खूप पाणी गेले आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेत माझ्यासह शिवसेना भवनात सर्व शिवसेनेचे नेते आमदार, खासदार असतील. आणि मग आम्ही भाजपच्या नेत्यांना सणसणीत प्रत्युत्तर देऊ, असे ते म्हणाले आहेत.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे दररोज काहीबाही बोलून आमची करमणूक करत असतात. पण आता महाविकास आघाडी देखील त्यांना कोणी विचारत नाही, असे दिसते आहे. ते एकाकी पडले आहेत. आणि आता तर आपण शिवसेनेचे तरी नेते आहोत की नाही याविषयी त्यांना शंका आहे. त्यामुळे ते बोलताना तारतम्य विसरून बोलत असतात. संजय राऊत यांनी आपल्या सामना त्या कॉलमचे नाव “रोखठोक” हे बदलून “ना ताळ ना तंत्र”, असे ठेवावे असा प्रतिटोला अशिष शेलार यांनी त्यांना लगावला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App