Sanjay Raut phone tapping : महाराष्ट्रात सत्ता मिळवायला केजीबी, सीआयएला आणा, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आले आहेत. आपला फोन टॅप होतो आहे, असा आरोप करीत संजय राऊतांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. Sanjay Raut phone tapping: Bring KGB, CIA to get power in Maharashtra, Sanjay Raut’s call to Devendra Fadnavis

गोव्यातले नेते सुदीन ढवळीकर यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा आरोप केला होता. हा फोन टॅपिंगचा पॅटर्न महाराष्ट्रात आणि देशात अन्यत्र देखील चालू आहे. महाराष्ट्रातले नेतेच गोव्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या निवडणूकीचे सूत्रधार होते याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.



रश्मी शुक्ला केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या दक्षिण विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पोस्टिंग सध्या हैदराबादेत आहे. त्यांच्यावर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल आहे. त्या या गुन्ह्याविरोधात मुंबई हायकोर्टात गेल्या आहेत.

मात्र, आता याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार चांगले काम करतेय हे विरोधी पक्षाला पाहावत नाही. पण त्यांची सत्ता महाराष्ट्रात येत नाही म्हणून आता केजीबी, सीआयए या परदेशी गुप्तहेर संस्थांनाही आणा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारला लगावला.

Sanjay Raut phone tapping: Bring KGB, CIA to get power in Maharashtra, Sanjay Raut’s call to Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात