समीर वानखेडेंच्या बारचा परवाना रद्द ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अल्पवयीन असताना खोटे वय दाखवून बार , परमीट रुमचे लायसन्स घेतल्या प्रकरणी नवी मुंबईतील सद्गुरु हॉटेल अँण्ड बारचा परवाना रद्द करण्यात आला. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (एनसीबी) मुंबईतील माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मालकीचा हा बार आहे. Sameer Wankhede’s bar license revoked
Action of Thane District Collector

ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश दिले. अल्पवयीन असताना वानखेडे यांनी बार , परमीट रुमचे लायसन्स घेणे. ‘आप यूपीएससी’नोकरीत असताना स्वत:चा बार सुरु करणे असा आक्षेप होता.



समीर वानखेडे यांनी 1997 मध्ये बारचा परवाना मिळवला होता. मात्र, त्यावेळी समीर वानखेडे यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते. परंतु, वानखेडे यांनी खोटी माहिती देऊन बारचा परवाना मिळवला होता. ही माहिती उघड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून बारचा परवानाच रद्द करण्यात आला.

वानखेडे यांना एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरुन हटवल्यानंत त्यांच्याविरुद्धचा लढा सुरुच ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्याचवेळी मलिक यांनी वानखेडे यांनी अवैधरित्या मिळवलेल्या बार आणि परमीट रुम परवान्याविषयी भांडाफोड केला.

Sameer Wankhede’s bar license revoked Action of Thane District Collector

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात