छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल; राज ठाकरेंनी आधीचे केले होते सावध; व्हिडिओ व्हायरल 

प्रतिनिधी

मुंबई : राम नवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि राम नवमीला मालवणीत मुसलमानांनी दंगल केली. पोलीस ठाण्यावर दगडफेक, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ केली. राम नवमीच्या दिवशी मालवणीतही मुसलमानांनी राम नवमी शोभायात्रेवर दगडफेक केली, जाळपोळ, तोडफोड करत दंगल केली. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. Riots in Chhatrapati Sambhajinagar, Malvani; Raj Thackeray had earlier cautioned

याबाबत आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यात अशा दंगली होतील, याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच पूर्वसूचना दिली होती, असा दावा करत थेट राज ठाकरे यांचे भाषणच व्हायरल केले आहे.

या दंगलीवरून विरोधी पक्ष राज्य सरकारवर टीका करत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे – फडणवीस सरकार या दंगली प्रायोजित करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाने एमआयएमच्या मदतीने या दंगली केल्याचा आरोपही होत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा काही भाग व्हायरल केला आहे. यात राज ठाकरे भविष्यातल्या दंगलींच्या शक्यता वर्तवत आहेत.


उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…


काय आहे व्हिडीओमध्ये?

राज ठाकरे जाहीर सभेत बोलताना म्हणाले होते की, आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सर्व माहिती आहे. झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर एकदा धाडी टाका, काय-काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल. पाकिस्तानसारख्या शत्रूची आपल्याला गरजच नाही. उद्या जर काही घडलं, तर आतमधली परिस्थिती आवरता आवरता आपल्या नाकी नऊ येतील. इतक्या गोष्टी आत भरल्या आहेत. परंतु आपलं लक्ष नाही. यासोबत मनसेने संभाजीनगरमधील दंगलीचा व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला आहे. यात पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ सुरू आहे.

अनेक मशिदी अशा आहेत, की ज्यांच्या आत काय सुरू आहे ते आपल्याला माहिती नाही, ही सगळी लोकं पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आले आहेत आणि आपण त्यांना स्वीकारलं आहे. आपल्या नगरसेवकांना, आमदारांना – खासदारांना याच्याशी काही देणंघेणं नाही. उलट आपले नेते यांना आधार कार्ड, शिधापत्रिका काढून देत असतात. आपलेच लोक त्यांना सर्वकाही पुरवतात. एक दिवस येईल जेव्हा सर्वांचे डोळे उघडतील.

Riots in Chhatrapati Sambhajinagar, Malvani; Raj Thackeray had earlier cautioned

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात