कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे याने एका २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचे अश्लील व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्यावर पाेलीसांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पाेलीसांकडे पिडित मुलीने तक्रार दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे याने एका २२ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचे अश्लील व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्यावर पाेलीसांनी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पाेलीसांकडे पिडित मुलीने तक्रार दिली आहे. Rape case registered against Gangster Gajanan Marne son Prathmesh Marne at Sinhagad road police station
सदर घटना ही २८ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान विविध ठिकाणी घडलेली आहे. पिडित २२ वर्षीय तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिची प्रथमेश मारणे साेबत ओळख झाली हाेती. त्यानंतर दाेघात मैत्री झाल्याने प्रथमेशने तिला खडकवासला परिसरात फिरण्यासाठी नेले हाेते.
मात्र, घरी पतत असताना त्याने एका लाॅजवर थांबून त्याने मुलीसाेबत जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेगवेगळया ठिकाणी नेऊन त्याने तिच्यासाेबत शारिरिक संबंध केले व तिच्या नकळत अश्लील व्हिडिओ काढले. ही बाब मुलीला समजल्यानंतर तिने प्रथमेशकडे संबंधित व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी केली.
परंतु ताे सदर आक्षेपार्ह व्हिडिओ डिलीट करत नसल्याने तसेच पाेलीसांकडे यासंर्दभात तक्रार दिल्यास साेशल मिडियावर तुझे व्हिडिओ टाकून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. याप्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत सिंहगड राेड पाेलीसांकडे धाव घेत त्याच्या विराेधात तक्रार दिली. याबाबत पुढील तपास सिंहगड राेड पाेलीस करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App