विशेष प्रतिनिधी
मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी प्रॉपर्टी डिलरकडून १७ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईतील पोलीस उपायुक्तासह दोघा पोलीस निरिक्षकांसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरिक्षक चिमाजी आढाव आणि सुनील माने अशी त्यांची नावे आहेत.Ransom demand of Rs 17 lakh, crime registered against three police officers, including Deputy Commissioner of Police and two police inspectors
याप्रकरणी गुरूशरणसिंग चौव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. चौव्हाण यांचा प्रॉफर्टी डिलींग आणि फायनान्सचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करण्याची धमकी या तिघांकडून दिली जात होती. एका खबऱ्याकडून चौव्हाण यांच्याकडून १७ लाख रुपयांची खंडणी तिघांनी घेतली.
मात्र, त्यानंतर आणखी पैशाची मागणी सुरू केली. चौव्हाण यांनी त्यास नकार दिला असता त्यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात गोवण्यात आले. त्यांना तिघांनी मारहाणही केली. त्याचबरोबर कोऱ्या कागदावर सह्या घेत जीवे मारण्याचीही धमकी दिली. हा सगळा प्रकार असह्य झाल्याने शेवटी चौव्हाण यांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App