नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत पराभव सर्वसामान्य शिवसैनिक संजय पवारांच्या झाला आहे. उद्धव ठाकरे यांचा हा राजकीय प्रयोग फसला आहे. पण भाजपला मात्र आनंद संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळवण्याचा झाला आहे!! राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर वर उल्लेख केलेली बाब ध्यानात येईल. Rajya Sabha elections: Defeat of Sanjay Pawar; But BJP got more votes than Anand Sanjay Raut !!
भाजपचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी काल मतदानापूर्वीच शिवसेनेचा एक संजय घरी जाणार असे राजकीय भाकित केले होते. त्यानुसार शिवसेनेचे कोल्हापूरचे संजय घरी गेले, तर मुंबईतले संजय राज्यसभेत पोहोचले. परंतु भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना संजय राऊत यांच्या पेक्षा जास्त मते मिळाली म्हणजे संजय राऊत यांना 41 मते मिळाली तर धनंजय महाडिक यांना 41.56 मते मिळाली याचा विशेष आनंद भाजपच्या नेत्यांना झाला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, अनिल बोंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आदी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून हा आनंद झळकत होता.
संजय राऊत हे भाजपच्या मनात काट्यासारखे रुतून बसल्याचे यातून दिसून आले. संजय राऊत तर रोज काही ना काहीतरी विषय काढून भाजपला डिवचत असतात. त्यांच्या विरोधात त्यांच्या ताकदीचा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश भाजपला त्यांच्यासमोर उभा करता आलेला नाही. त्यामुळे अनेकदा भाजपचे नेते त्यांना इग्नोर करतात. संजय राऊत फार मोठे नेते नाही, असे म्हणत राहतात. भाजप नेत्यांच्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही असे नाही.
पण संजय राऊत रोज ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन भाजपला डिवचत असतात त्यांना परिणामकारक उत्तर देणे आणि गप्प बसवणे भाजपच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना गेल्या अडीच वर्षात तितकेसे जमले नव्हते हीदेखील वस्तुस्थिती आहे. राज्यसभा निवडणुकीतील मतदानाच्या निमित्ताने मात्र भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव करून आपली ताकद दाखवून दिली. त्याच वेळी संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळवून भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आणला हे येथे अधोरेखित केले पाहिजे. किंबहुना भाजपच्या आनंदाचे इंगितच संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाल्यात आहे. भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या चेहऱ्यावरून हे दिसून येते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App