राज ठाकरेंचा कोणाला टोला? : सत्तेच्या खुर्चीवर मी बसणार नाही, तुम्हालाच बसवेन

प्रतिनिधी

मुंबई : मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणाऱ्यातला नाही. मी फक्त आणि फक्त तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करा, असे आवाहन मनसैनिकांना केले. Raj Thackeray to whom? : I will not sit on the seat of power, I will sit on you



राज ठाकरे म्हणाले की, लवकरच आपण सत्तेच्या खुर्चीवर बसू. आपल्यातील एकजण त्या खुर्चीवर असेल. पण तो मी नसेन. यापूर्वी जी विधाने आणि बातम्या माध्यमांत आल्या, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणुका लढवणार आहोत. सध्याच्या घडामोडींमुळे शिवसेनेला सहानुभूती मिळतेय, हा भ्रम आहे. या घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणून मतदार आपला विचार करतील. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचा, असेही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

 कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

राज ठाकरे यांनी या मेळाव्यात ‘सहा एम’चा फार्म्युला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिझ; या सहा ‘एम’वर काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मेकॅनिझ म्हणजे टेक्नॉलीजीचा वापर करा, मेसेज म्हणजे पक्षाचे विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. निवडणुकीसाठी पैसा लागतोच, तो कुठून तरी उभा करून आपण निवडणुका लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray to whom? : I will not sit on the seat of power, I will sit on you

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात