राहुल गांधी अदानी मुद्दा सोडत नसताना अदानींच्या समर्थनासाठी शरद पवार सरसावले!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे निलंबित खासदार राहुल गांधी अदानींच्या शेल कंपनीचा मुद्दा हातचा सोडत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मात्र अदानींच्या समर्थनासाठी उघडपणे बाहेर आले आहेत. आम्ही विरोधात असताना पूर्वी टाटा – बिर्लांवर टीका करायचो. आता टीका करण्यासाठी अदानी – अंबानींचे नाव वापरले जात आहे, असा टोला त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता लगावला आहे. एनडीटीव्ही च्या मुलाखतीत ते बोलत होते. Rahul Gandhi continues to hit out at adani, but sharad Pawar come out in open in support of adani

अदानी समूहातील शेल कंपन्यात कोणी गुंतवले हा राहुल गांधींनी लावून धरलेला मुद्दा, तसेच अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने अदानीसंबंधी जाहीर केलेला रिपोर्ट, यासंबंधी जेपीसीची मागणी केली आहे. पण या मुद्यावर शरद पवार यांनी काँग्रेस विरोधातला सूर उमटवला आहे. अदानी समूहाला टार्गेट करताना हिंडेनबर्ग सारख्या कधीही न ऐकलेल्या एका कंपनीचा अहवाल आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व देऊन वापरला जात आहे, अशी टीकाही पवारांनी केली आहे.


“राहुल गांधी हे आधुनिक भारताचे महात्मा गांधी आहेत” – काँग्रेस आमदाराचं विधान!


जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचेच नेहमी बहुमत राहिले आहे. त्यामुळे जे काही सत्य आहे, ते बाहेर येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाडूनच जे काही आहे ते, सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे, असेही पवार म्हणाले आहेत.

आम्ही जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा आम्हीही सरकारवर टीका करण्यासाठी टाटा बिर्ला या उद्योगपतींवर टीका करायचो. पण टाटांनी या देशाच्या विकासात मोठे योगदान केले आहे. आजकाल टीका करण्यासाठी टाटा – बिर्ला यांच्याऐवजी अदानी – अंबानी यांच्यावर हल्ले होताना दिसत आहे. मात्र अदानी यांचे देशातील ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशी पुस्ती पवारांनी जोडली आहे.

Rahul Gandhi continues to hit out at adani, but sharad Pawar come out in open in support of adani

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात