या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि अन्य महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Pune: Muralidhar Mohol called a meeting tomorrow on the background of Corona
विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका अलर्ट झाली आहे.उद्या ( सोमवारी 3 जानेवारी ) महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि अन्य महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीत पुणे शहरात कोरोना निर्बंधांमध्ये वाढ करावी का? तसंच शाळा पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात का? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान दुसरीकडे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तयारीही करण्यात आली आहे. पुणे शहरात ४० ठिकाणी लसीकरण होणार आहे. त्यासाठी जवळपास अडीच लाख पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती मिळतेय.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App