विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस संघटनेत अजबच तर्कट आहे. कोणाला काय पद मिळेल सांगता येत नाही.जी 23 या नाराज गटात जाऊन पक्षाच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.Prithviraj Chavan, who went to G23 and broke disciplined, is the chairman of the disciplinary committee
काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिले होते.या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव होते. एका अर्थाने हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाविरोधात बंड होते. गांधी घराण्याच्या विरोधात आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध या नेत्यांचा रोख होता.यावरून महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकाही झाली होती.
गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणारे पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील, असा इशारा मंत्री सुनील केदार यांनी दिला होता. आता हेच पृथ्वीराज चव्हाण केदार यांना शिस्तीचे धडे कसे देणार अशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात रंगली आहे.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी तर पृथ्वीराज चव्हाण आणि इतर जी 23 नेत्यांवर षड्यंत्र रचल्याचा आरोप केला होता. हे पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत बंद खोलीत रचले जाणारे षडयंत्र या पत्रामुळे समोर आले आहे, असे त्यांनी म्हटले होते. आता याच निरुपम यांना शिस्त पाळली नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App