• Download App
    उद्धव ठाकरेंवर पक्षश्रेष्ठी नाराज : एकनाथ शिंदे-संजय राऊत यांना मुख्यमंत्री केले असते तर ...शरद पवारांची खंत!।Party leader angry over Uddhav Thackeray: If Eknath Shinde-Sanjay Raut had been made Chief Minister ... Sharad Pawar's grief!

    उद्धव ठाकरेंवर पवारांची नाराजी : एकनाथ शिंदे-संजय राऊत यांना मुख्यमंत्री केले असते तर… शरद पवारांची खंत!

    महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड असंतोष आहेच. मात्र, त्यात प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत फाटाफूट अटळ आहे.


    महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभा करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व नाही. Party leader angry over Uddhav Thackeray: If Eknath Shinde-Sanjay Raut had been made Chief Minister … Sharad Pawar’s grief!


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेल्या शरद पवारांचा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून सर्वात मोठी चूक केल्याची भावना देखील शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे बोलताना व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे किंवा संजय राऊत यांना मुख्यमंत्री केलं असतं तर परवडलं असतं असेही शरद पवार म्हणाले असल्याचे उघड झाले आहे .

    आघाडीतील पक्षांच्या आधीच शिवसेनेत विद्रोहाची बीजे रोवली जातील, असा गौप्यस्फोट राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी केला आहे. ‘पश्चिम बंगाल ते पंढरपूर’ या चर्चासत्रात ते बोलत होते.



    शिवसेनेचा सगळा कारभार अनिल परब यांच्याच हातात दिल्याने सनेतीलही अनेक जण नाराज आहेत. एकनाथ शिंदेंसारख्या ज्या ज्येष्ठ नेत्यांना शिवसेना मुख्यमंत्री करणार होती, त्यांच्या खात्यातील सगळी कामे मातोश्रीमध्ये बसून दुसरेच कुणी करत आहेत, अशी तक्रार खुद्द एकनाथ शिंदे यांनीच केली आहे.शिवसेनाप्रमुखांनंतर पक्षनिष्ठा राहिली नसल्याचा हा परिणाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयांवर शिवसेनेतील अनेकजण नाराज आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे .

    शरद पवार हे कधी महाराष्ट्राचे ममता बॅनर्जी होऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरेंना ते शक्यच नाही. शरद पवारांनी आयुष्यभरात कधी ५२-५५ आमदारांच्या पुढे सत्ता आणली नाही. शिवसेनेला ते शक्य नाही आणि ममता बॅनर्जीं महाराष्ट्रात येऊन त्यांच्या तारणहार बनतील, अशी अपेक्षाही नाही.ममतांची राजकीय शैली महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभा करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये फाटाफूट अटळ आहे ती लवकरच होईल, शिवसेनेतच अनेक जण नाराज आहेत. सेना आतून पोखरली गेली आहे. पक्षांतर्गत खदखद आहे. असा दावाही थत्तेंनी केला आहे.

    Party leader angry over Uddhav Thackeray: If Eknath Shinde-Sanjay Raut had been made Chief Minister … Sharad Pawar’s grief!

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस