राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करणाऱ्या मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ना खंजीर उठेगा, ना तलवार इनसे, ये बाजू मेरे आजमाए हुए है!” नवाब मलिक यांच्या या ट्विटवरून ते कुणाकडे बोट दाखवत आहेत हे कळू शकले नसले तरी या अनुषंगांनी चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत. याआधीही मलिक यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.NCP Leader Nawab Malik New Tweet creats Speculations
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करणाऱ्या मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ना खंजीर उठेगा, ना तलवार इनसे, ये बाजू मेरे आजमाए हुए है!” नवाब मलिक यांच्या या ट्विटवरून ते कुणाकडे बोट दाखवत आहेत हे कळू शकले नसले तरी या अनुषंगांनी चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत. याआधीही मलिक यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
न खंजर उठेगा, न तलवार इन सेये बाज़ू मेरे आज़माए हुए हैं ! — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 4, 2021
न खंजर उठेगा, न तलवार इन सेये बाज़ू मेरे आज़माए हुए हैं !
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 4, 2021
बुधवारीही मलिक यांनी एक मजेशीर ट्विट केले होते, ज्यामुळे लोकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले होते. मलिक यांनी ट्विटमध्ये लिहिले की, हॉटेल द ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत, रविवारी भेटू. आपल्या ट्विटमध्ये मलिक यांनी लिहिले, दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
हॉटेल ललितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत… रविवारी भेटू. मलिक यांच्या या ट्विटनंतर आता अखेर द ललित हॉटेलबद्दल काय सांगणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले.
बॉलिवूडवर निशाणा साधण्यापासून ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि बहीणही मलिक यांचे मुद्दे खोडत आहेत. या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आता कोणते नवीन वळण घेते हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App